मुर्तिजापूर तालुक्यातील शिक्षक कृतीशील पुरस्काराने सन्मानीत

Spread the love

मुर्तिजापूर तालुक्यातील शिक्षक कृतीशील पुरस्काराने सन्मानीत

 

 

M marathi news media/ मिलींद जामनिक

 

 

मूर्तिजापूर – राष्ट्रहित,समाजहित,विद्यार्थीहित व शिक्षकहित जपणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.परिषदेच्या अकोला शाखेच्या वतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी कृतिशील पुरस्काराने गौरविण्यात येते.

मूर्तिजापूर तालुक्यातील चार शिक्षकांना यावर्षी कृतिशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये जि.प.शाळा राजनापूर खिनखिनी येथील नागोराव शेजव,जि.प.उर्दू प्रा.शाळा लंघापूर येथील नसीम आरा अब्दूल नजीर,जि.प.प्रा. शाळा पिंगळा येथील अनंत मिसाळ,जि.प.प्रा.शाळा लाईत येथील अनूप दळवी यांना कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मागील वर्षी कोरोनामुळे पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडला होता.मागील वर्षीचे कृतीशील पुरस्कारप्राप्त शिक्षक मनोज लेखनार, शितल जाधव,हेमंत पापळे,अब्दुल रशीद अब्दुल लतीफ,अर्चना तायडे,अरुण बोळे यांनासुद्धा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.शिक्षण क्षेत्रात कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता कर्तव्यतत्परतेने नाविन्यपूर्ण पद्धतीने व उपक्रशील कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्काराकरिता निवड करण्यात येते.त्यामुळे संपूर्ण जिल्हयातील शिक्षकांचे या सोहळ्याकडे लक्ष असते.या नाविण्यपुर्ण उपक्रमासोबत संघटनेमार्फत रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर,शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकरिता कॅम्पचे आयोजन,कोविड १९ मध्ये अन्नदान वाटप असे विविध उपक्रम संघटनेमार्फत राबविण्यात आले.

त्यामुळे आज संपूर्ण जिल्हयात या संघटनेकडे मोठ्या सन्मानाने पाहण्यात येते. कृतिशील शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे उदघाटक पदवीधर आमदार माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजेई सोसायटीचे अध्यक्ष अँड.मोतीसिंह मोहता उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना माननीय आमदार डॉ. रणजीत पाटील म्हणाले की शिक्षक हा तीन अक्षरी शब्द आहे त्या शब्दात एवढी प्रचंड शक्ती आहे कि ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जाते.विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करतो तोच खरा गुरू असतो. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता यांनी शिक्षकांनी कोविड १९ काळात केलेल्या कार्याचा गौरव केला तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांनी ही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे डॉ.अपर्णाताई पाटील,प्राचार्य डॉ.एस.जी.चापके,प्राचार्य डॉ.विजय नानोटी,प्राचार्य डॉ.जगदिश साबू,महिला आघाडी प्रमुख वंदना बोर्डे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार,शत्रुघ्न बिरकड,अविनाश बोर्डे,प्रकाश डवले,नरेंद्र खाडे,प्रदीप थोरात,गजानन जायभाये, साबीर कमाल,संतोषराव महल्ले,नामदेवराव फाले,शशिकांत गायकवाड, संजय बरडे,एम एम तायडे,जव्वाद हुसेन,विजय ठाकरे देवानंद मोरे,दिलीप सरदार,पुंडलिक भदे,गजानन लेखनार,गजानन काळे,किशोर चतरकर,संतोष झामरे,मोहम्मद वसीमोद्दीन,दत्तात्रय सोनवणे,रुचिता खेतकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यवाह सचिन काठोळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन नितीन बंडावार व अमित सुरपाटणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat