भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराचा उडवले:दुचाकीस्वार जागीच ठार

Spread the love

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराचा उडवले:दुचाकीस्वार जागीच ठार

 

 

 

म मराठी न्यूज नेटवर्क | मिलींद जामनिक

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या जामठी फाट्याजवळ उमा नदीच्या पुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने अपघात वाढतच आहे.सतिश रघुनाथ सुलताने (३८) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच २७ के.एल ८२२७ ने अमरावती वरून मुर्तिजापूरकडे येत असतांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एमएच ४८ सी ८६४९ ने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम पाटील व त्यांचे सहकारी दाखल झाले व वंदे मातरम आपत्कालीन पथकाने मृतदेह शविच्छेदनसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.पुढील तपास माना पोलिस करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat