राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयामुळे अपघातात वाढ

Spread the love

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयामुळे अपघातात वाढ

 

चिंचखेड फाट्यानजीक मालवाहू गाडी उलटली

 

 

M marathi news media| मिलींद जामनिक

 

मूर्तिजापूर – राष्ट्रीय महामार्ग ६ वरील चिंचखेड फाट्यानजीक डाळींब भरून जाणाऱ्या मालवाहू जीपचा मोठे खड्डे न दिसल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून सद्यस्थितीत पावसाळा सुरू आहे .पावसाने राष्ट्रीय महामार्ग जागोजागी उखडलेला आहे . वरून पाऊस सुरू असला म्हणजे वाहन चालकांना वाहन चालविताना रस्त्यावरील खड्डयांचा अंदाज येत नसल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघाताची मालिका सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे . शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान सोलापूर येथून जबलपूर करिता तीस क्विंटल डाळिंब भरून जाणारी महेंद्र बोलेरो क्र एम एच ३० बी डी ३८७१ या वाहनाचा चालक शेख अजीज शेख वजीर वय ४५ रा मूर्तिजापुर हा राष्ट्रीय माहामार्गावरील चिंचखेड फाटा ओलांडून समोर जात असताना वरून पाऊस सुरू असल्यामूळे रस्त्यावरील खड्डयाने वाहनावरील नियंत्रण गेल्याने मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला पलट्या घेवून उलटली . डाळींब सर्वत्र अस्तव्यस्त विखुरलेले असल्याने मार्गाने जाणाऱ्यानी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला . मात्र सुदैवाने जिवीतहानी टळली चालकाने वाहनातून सहीसलामत बाहेर निघून मूर्तिजापुर येथील नातलगांना मदतीसाठी बोलावून घेतले .तसेच ३० क्विंटल डाळींब दुसऱ्या वाहनातुन जबलपूर रवाना केल्याची माहिती मिळाली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat