आरोपीस मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक 

Spread the love

अमरावती कारागृहातुन पसार झालेल्या आरोपीस मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक..

 

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया | मिलींद जामनिक

 

 

 

मूर्तिजापूर – ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सागंवा मेळ येथील आरोपी अमरावती खुले कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता सदर आरोपी कारागृहातुन पळून गेला असल्याची तक्रार आरोपी विरुद्ध गुन्हा फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन दाखल आहे आरोपी हा सांगवा मेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली असता सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडून अटक करण्यात आली प्राप्त माहिती नुसार पो.स्टे. मुर्तिजापूर अपराध क्र. ७३/२०१२ क्र ३०२ भा.द.वि.चे गुन्हयातील आरोपी संतोष श्रीराम सोळंके वय 30 वर्ष रा. सांगवामेळ ता. मुर्तिजापूर जि.अकोला हयाला सदर गुन्ह्यात अतिरीक्त सत्र न्यायालय अकोला यांनी दिनांक ३०/०६ /२०१४ रोजी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सदर आरोपी हा अमरावती खुले कारागृहात शिक्षा भोगत असतांना कारागृहातून दि. ३१/०८/२०२१ रोजी पळाला फिर्याद नारायण रामचंद्र चवरे वय ५० वर्ष धंदा नोकरी तुरुंगरक्षक मध्यवर्ती कारागृह अगरावती यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. फ्रेजरपूरा अमरावती येथे सदर आरोपी विरुद्ध अप क्र १६३०/२०२१ कलम २२४ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपी हा सांगवा मेळ येथेअसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून ठाणेदार पांडव यांचे मार्गदर्शनाखाली पो हे. कॉ. सुभाष उघडे, संजय शिंगणे, संजय खंडारे, पो को गजानन सयाम होमगार्ड सैनिक वितीन अग्न, दहीवर यांनी सांगवा मेळ मधून सदर आरोपीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीस फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अमरावती यांच्या ताब्यात दिले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat