मुर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचा आणि घरांचा सर्वे त्वरित करून नुकसान भरपाई द्या 

Spread the love

मुर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचा आणि घरांचा सर्वे त्वरित करून नुकसान भरपाई द्या 

 

नुकसान भरपाई न दिल्यास वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनाचा पवित्रा

 

 

म मराठी न्यूज मिडिया | मिलींद जामनिक

 

मुर्तिजापूर – तालुक्यातील ३३ गावांतील ४४३ हेक्टर शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा आणि ५० राहत्या घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि जि प पदाधिकारी यांच्यासह मुर्तिजापूर तालुक्यातील बपोरी, मंदुरा शेलुबाजार,कवठा,बोर्टा, गुंजवाडा, खापरवाडा व इतर गावांतील नुकसान झालेल्या शेतीचे व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापुस, सोयाबीन,तुर,मुंगाची रोपे काळी पडुन जळलेल्या अवस्थेत दीसुन आले असता शेतकऱ्यांना सर्वे बाबत विचारणा केली असता तलाठी, पटवारी,कृषी अधिकारी कुणीही सर्वेला आले नाही आणि अर्ज करावा असे सांगतात अशी उत्तरे मिळाली.

अतिवृष्टीग्रस्तांच्या बाबतीत शासकिय कर्मचारी आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निषेध करण्यात आला. त्वरित नुकसान झालेल्या शेतीचे आणि घरांचे सर्वेक्षण करुन हेक्टरी २५००० रु नुकसान भरपाई न दिल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तालुका आणि जिल्हा प्रशासनाविरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दिला.

या दौऱ्यात जि प कृषी सभापती पंजाबराव वडाळ, जि प उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड,जि प सदस्य संजय नाईक,मोहन रोकडे,बपोरी जि प सर्कल उमेदवार बाळासाहेब खंडारे, शशिकांत सरोदे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, पुरषोत्तम अहिर,विजय तायडे,संजय तायडे, पंडित वाघमारे, राहुल महाजन,जीवन ढोकणे,सुनिल सरदार,

पं स सदस्य सुनील तामखाने, पं स सदस्य नकुल काटे, पं स सदस्य सचिन दिवनाले, रामभाऊ हिंगणकर,संजय वानखडे, नगरसेवक वैभव यादव, सुनिल सरदार, सतिष गवई,कीशोर राउत,संतोष गणेशे, रंजित शिरसाट,संकेत कोल्हे, महेंद्र तायडे,रोषन वानखडे, उमेश तायडे, श्रीकृष्ण सरदार,राजु वर्घट, प्रमोद आंबेकर, सुधाकर वर्हाडे,राजु वाघमारे, बाळु तेलमोरे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat