पोकरा समितीच्या वतीने ट्रॅक्टर व बी बी एफ यंत्रांचे वाटप !

Spread the love

पोकरा समितीच्या वतीने ट्रॅक्टर व बी बी एफ यंत्रांचे वाटप !

 

सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा :-सरपंच प्रशांत इंगळे

 

 

 

मूर्तिजापूर | मिलींद जामनिक

 

मुर्तिजापूर :- तालुक्यातील रंभापुर गट ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या उनखेड, नागठाना,रंभापुर व सुल्तानपूर या गावातील नागरिकांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व बी बी एफ यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. जागतिक बँक व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा या योजनेची निर्मिती करून शेतकऱ्यांना नव संजीवनी दिली आहे. गरजू शेतकऱ्यांनी या प्रकल्पात अर्ज करून शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन नानाजी देशमख कृषि संजीवनी प्रकल्पाचे अध्यक्ष तथा रंभापुर गट ग्राम पंचायत चे सरपंच प्रशांत इंगळे यांनी केले.नागठाना येथील शेतकरी आनंद नंदकिशोर सुळे यांना ट्रॅक्टर करीता १२५०००/- हजार आणि बी बी एफ पेरनि यंत्र करिता ४५०००/- हजार रुपये अनुदान तसेच शालू दिनेश खरबडकर यांना ट्रॅक्टर आणि बी बी एफ पेरणी यंत्र करीता १५९८००/-हजार रुपये अनुदान देण्यात आले. तसेच इतर शेतकऱ्यांना फळबाग लागवड,तुषार सिंचन,ठिबक सिंचन,विद्युत मोटर पंप, पीव्हीसी पाईप,शेळी पालन करीता प्रकल्पाच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले आहे. या प्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे अध्यक्ष तथा रंभापुर गट ग्राम पंचायत चे सरपंच प्रशांत इंगळे,नागठाना या गावाचे कृषी सहायक संतोष राठोड,प्रकल्पाचे समन्वयक देवानंद खिल्लारे,ग्राम पंचायत व समिती सदस्य हरिदास सोळंके, लाभार्थी आनंद सुळे,सत्तार कुरेशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat