शहर व तालुक्यात डेंगू आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ !

Spread the love

शहर व तालुक्यात डेंगू आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ !

 

 

सदर आजाराचा रुग्ण योजनेत बसवून आर्थिक लूट ! जनसामान्यांत चर्चेला उधाण 

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया | मिलींद जामनिक

 

मूर्तिजापूर – शहर व तालुक्यात डेंगू आजाराच्या रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे आलेल्या पाऊसामुळे शहरात व ग्रामीण भागात बऱ्याच ठीकानी पाणी साचलेले असल्याचे दिसून येत आहे गांजर गवत सुध्दा वाढलेले आहे काही शाळेच्या परिसरात पावसामुळे घाणीचे साम्राज्य असल्याचे पालक वर्गाकडून बोलले जात आहे अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन सदर आजार बळावल्या जात आहे खासकरून ह्या आजाराची लक्षणे ही लहान मुलांन मध्ये जास्त प्रमाणात आढळत असल्याचे बोलल्या जात आहे रक्तातील पेशी कमी होणे/जास्त होणे ,टायफाईड या आजारांची सुध्दा बरीच रुग्ण असल्याचेही सांगण्यात येत आहे यासर्व आजाराच्या इलाजासाठी खाजगी दवाखान्यात फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे यासाठी संबधित विभागाने काही उपाय योजना करायला हव्या अशी मागणी जोर धरत आहे या आजारापैकी डेंगू हा शासकीय योजनेत येत असल्याने काही खाजगी दवाखान्यात इलाजासाठी योजनेच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याची चर्चा आहे जनसामान्याच्या चर्चे दरम्यानच्या पेशेंट हा दवाखान्यात तपासणीसाठी गेल्या बरोबर त्याची रक्ताची तपासणी करायला सांगणे व रक्त तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याला डेंगू आजार आहे असे सांगून त्यास दवाखान्यात दाखल करून घेणे दाखल केस पेपरवर औषधी जास्त प्रमाणात लिहणे व प्रत्यक्षात देते वेळी कमी प्रमाणात देने असा प्रकार चालू असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे जनता ही ज्यांना देवाची उपमा देऊन जो विश्वास ठेवून त्यांचेकडे पाहते त्यांना काय म्हणून देव म्हणावं असा प्रश्न जनसामान्यांना भेडसावत आहे सर्वात विश्वसनिय क्षेत्र समजल्या जाणाऱ्या क्षेत्राला अश्या काही लुटारूपणा धारण केलेल्यामुळे कीड लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे एक जण करणी करतो आणि चांगल्या अनेकांना त्याचे दुष परिणाम भोगावे लागतात यामुळे काही जनतेच्या नजरेमध्ये चांगल्या लोकांचे मरण होत असल्याचे दिसून येत आहे याबद्दल जनसामान्यांकडून नाराजीचे सूर निघत आहे अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या प्रकरणाने HIV बाधित रक्त दिल्याने चुमुकलीचे अख्ख आयुष्य बरबाद झालय यामुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकरण सर्वांना माहीत आहे त्यामुळे दवाखाना की छापखाना ? असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात अनुत्तरित आहेत याबाबत जनसामान्यात चर्चेला उत आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat