सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माना पोलिसांचा कुरुम येथे रूट मार्च

Spread the love

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माना पोलिसांचा कुरुम येथे रूट मार्च

 

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया| मिलींद जामनिक

 

 

मूर्तिजापूर – आगामी काळात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव तसेच ईतर उत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापुर तालुक्यातील कुरुम हे गाव संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते .कुरुम येथे कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणुन यासाठी माना पोलीस स्टेशन अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान कुरुम येथील गावाच्या मुख्यमार्गाने तसेच मिश्र वस्तीतून व संवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला . यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत , पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील ,पोलीस उपनिरीक्षक शिल्पा धुर्वे , कुरुम बिटचे हेड जमादार दिलीप नागोलकर , माना बिटचे जमादार पंजाब इंगळे , शेलुबाजार बिटचे जमादार देवानंद दंदी , प्रदीप उमक , नंदकिशोर टिकार , शेगोकार , शिपाई निलेश इंगळे , राजेश डोंगरे , उमेश हरमकर , शशिकांत इंगळे , रमाकांत वाघमारे , गृह रक्षक दलाचे अनील कुर्हेकर , दिलीप वाडेकर व पोलीस कर्मचारी रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते . यावेळी सणासुदीच्या काळात योग्य तो बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सज्ज राहावे अशा सूचना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat