लाखपुरी टाकळी घाट गणेश विसर्जनसाठी सज्ज

Spread the love

लाखपुरी टाकळी घाट गणेश विसर्जनसाठी सज्ज

 

 

ठाणेदार जी एस पांडव यांचे कडून उपाययोजना

 

 

म मराठी न्यूज मिडिया | मिलींद जामनिक

 

 

मूर्तिजापुर – मूर्तिजापूर व दर्यापुर तालुक्यातील दरवर्षी तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे विसर्जन साठी येणारे सार्वजनिक व घरघुती गणेश मूर्तिकरिता यावर्षी महापुरमुळे लाखपुरी गावात गाळ साचला असल्याने विसर्जन साठी लाखपुरी टाकळी येथील लहान पुल निश्चित करण्यात आला आहे.येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी श्री गणेश मूर्ती विसर्जन असल्याने गुरुवारी मूर्तिजापुर ग्रामीण ठाणेदार जी एस पांडव यांनी लाखपुरी व टाकळी येथील आफतकालीन पथक ,स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करुन विविध उपाययोजना केल्या.यावेळी ठाणेदार जी एस पांडव ,पीएसआय बोरोकार , हे कॅा लांजेवार पो कॉ खेडकर यांच्यासह श्री लक्षेक्ष्वर संस्थान अध्यक्ष राजु दहापुते टाकळी पो पा शकील पटेल , लाखपुरी तंटामुक्ति अध्यक्ष नजाकत पटेल , लाखपुरी पो पा दिगम्बर नाचने ,स्वयंसेवक व आफतकालीन पथकाचे सदस्य ओम बनभेरू , सुरज कैथवास , शेख वाजिद , सचिन तामसे , कैलास श्रीनाथ ,रेहान पटेल , जितु कैथवास ,वसीम पटेल ,संजय सुरदुसे , प्रवीण सुरदुसे ,शे सलीम ,जगन सुरदुसे , विजय तामसे इत्यादि उपस्थित होते.

 

__________________________________

 

शनिवार व रविवारला श्री गणेश मूर्ती विसर्जनाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ५ पर्यंत राहील कोरोना निर्बंधामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या ४ सदस्यानी व घरघुती दोन सदस्यानी मूर्ती विसर्जन करिता यावे.लहान मुलांना अणु नये.विसर्जन सोहळा सुरळीत पार पळावा यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे.

 

ठाणेदार जी.एस.पांडव 

     ग्रा.पो.स्टे मूर्तिजापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat