पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हिवरा कोरडे येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न .

Spread the love

पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हिवरा कोरडे येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न .

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया /मिलींद जामनिक

 

 

मुतिजापूर- तालुक्यातील बपोरी सर्कलमधील हिवरा कोरडे या गावात १३ऑक्टोंबर २०२१ रोजी हिवरा कोरडे येथील स्वर्गीय बाबासाहेब कोरडे सभागृह ,येथे रोटरी क्लब ऑफ हँगिंग गार्डन मुंबई नेत्र रुग्णालय अकोला. तसेच उन्नत भारत अभियान अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव अकोला. व श्री साईनाथ शिक्षण संस्था व, मारुती देवस्थान ट्रस्ट हिवरा कोरडे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त भव्य नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सकाळी ९ ते ११ या वेळात पार पडले यामध्ये एकूण ११७ रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यामधून जवळपास ३६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याकरीता निवड करण्यात आली त्यांना अकोला येथे दमानी नेत्र रुग्णालय आपातापा रोड अकोला या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा देऊन बोलावण्यात आले .मोतीबिंदू तपासणी करीता दमानी रुग्णालयाचे डॉ. देशमुख व त्यांचे सहकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक दिगंबर भुगूल यांनी केले कार्यक्रमाला श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सागर कोरडे ,गजानन कोरडे ,ज्ञानेश्वर कोरडे गोपाल कोरडे ,प्रकाश मुळे ,विजय कोंडे ,गजानन गेडाम निलेश साबळे इत्यादी लोकांनी कार्यक्रम पार पाडण्याकरिता अथक परिश्रम घेतले सदर नेत्रतपासणी चा लाभ सोनोरी ,बपोरी ,कवठा शेलु ,शेलुबाजार ,ब्रम्ही, लोणसणा, पोही इत्यादी गावांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat