बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी बाबत कृषीदूताचे मार्गदर्शन 

Spread the love

बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी बाबत कृषीदूताचे मार्गदर्शन 

 

 

म मराठी न्यूज मिडिया/ मिलींद जामनिक

 

 

मूर्तिजापूर – तालुक्यातील ब्रम्ही बाई गावात समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा जी.बुलढाणा येथे बी.एस.सी.कृषी अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गौरव प्रमोद थोरात याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.पेरणी करण्या आधी बियाणांची बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे कारण जमिनीतील कीडी पासून संरक्षण करून झाडांची उगवण चांगली होते.बीज प्रक्रिया करतांना कोणत्या औषधे वापरावी आणि त्यापासून होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले त्यानंतर बियाणांची उगवण क्षमता चाचणी कशी करावी याबाबत माहिती दिली सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नितीन मेहत्रे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.मोहनजीत सिंग राजपुत ,वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा.विजय पवार,वनस्पती पेथॉलॉजी विभागाचे प्रा.शुभम काकड ,प्रा.पुरुषोत्तम चेके पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अविस कुमार सळेदार ,मनोज भालेराव ,अनिल जामनिक ,अनिल सळेदार ,भहुमोद्दीन ,सिद्धार्थ ढोके, किरण जामनिक,सुजित जामनिक,देवानंद जामनिक ,गजानन भालेराव,सुरेश जामनिक ,वामन जामनिक यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat