विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीची तालुक्यात भेट

Spread the love

विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीची तालुक्यात भेट

 

 

 

कागदपत्री झालेल्या कामांचा घेतला आढावा

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया/ मिलींद जामनिक

 

 

 

मूर्तिजापुर :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीने तालुक्यातील आदर्श ग्राम मधापुरी ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे कौतुक करून सरपंच प्रदीप ठाकरे व ग्रामसेवक रवींद्र राठोड यांचा सत्कार केला . यावेळी सर्व कागदपत्राची विचारपूस करीत , असता सर्व कामे नियोजनबध्द पध्दतीने तसेच सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांचाही गावाचा विकास हा ते शक्य होतो . निश्चितच चांगल्या प्रकारे काम होऊन गाव आदर्श झाल्याशिवाय राहत नाही असे उदगार आमदार

शिरीष चौधरी यांनी काढले .

या प्रसंगी आ.समीर कुणावार , आ.उदयसिंह राजपुत , आ.राजेश राठोड विधिमंडळ रो ह यो समितीच्या सन्माननीय सर्व सदस्यगणाचे स्वागत करण्यात आले .

यावेळी समितीने तालुक्यातील ग्राम अनभोरा येथे धावती भेट दिली. जामठी फाट्यावरील वनीकरणाच्या रोपवाटीकेला भेट दिली. कुरुम येथील रोपवाटीकेला भेट देवून कामाची पाहणी करून कागदपत्रे तपासली.

 

कुरुम येथील स्व उत्तमराव पाटील पार्क व रोपवाटीका तसेच रोजगार हमी योजनेतुन करण्यात आलेल्या कामाची रीतसर माहीतीची तक्रार तीन महिन्यापासून केलेली असून सुद्धा देण्यात न आल्याने जिल्हा भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख यांनी समिती प्रमुखांना निवेदन दिले . यावेळी समिती प्रमुख यांनी लागवड अधिकारी संगीता कोकणे यांना रीतसर माहिती देण्याच्या सूचना केल्या . कुरुम ग्रामपंचायतीने देखभाल दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होईल म्हणून सदरची मालमत्ता ताब्यात घेऊ नये असे संकेत दिले .

 

यावेळी विधीमंडळ समितीच्या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते , तहसीलदार प्रदीप पवार , गटविकास अधिकारी बालासाहेब बायस, सहा गटविकास अधिकारी बी पी पजई , सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता वानखडे, विस्तार अधिकारी विजय किर्तने , जिल्हा कृषी अधिकारी , मुरलीधर इंगळे, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे , पं स चे कृषी अधिकारी गोपाल बोंडे , कृषी विस्तार अधिकारी मनोज बोपटे , तालुका लागवड अधिकारी संगीता कोकणे, वनरक्षक भास्कर शिरभाते आदीसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat