रेपाडखेड येथे नेहरू युवा केंद्र,अकोला भारत सरकारच्या अंतर्गत”स्वच्छ भारत अभियान”उपक्रम                                                 

Spread the love

रेपाडखेड येथे नेहरू युवा केंद्र,अकोला भारत सरकारच्या अंतर्गत”स्वच्छ भारत अभियान”उपक्रम                                                 

 

 

M Marathi News Media-pankaj jamanik

 

 

अकोला/मुर्तीजापूर :- प्लास्टिकचा भस्मासूर हा जागतिक चिंतेचा विषय आहे.ही चिंता दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्लास्टिक मुक्त गाव करूया नेहरू युवा केंद्र ,अकोला भारत सरकारच्या अंतर्गत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक कु.रिंकू अनिल भटकर मुर्तीजापुर यांच्या संयुक्त विद्यमानाने “स्वच्छ भारत अभियान”या स्तुत्य उपक्रम रेपाडखेड ता.मूर्तिजापुर येथे संपन्न झाला.कार्यक्रमाला लाभलेल्या रेपाडखेडचे सरपंच रूपाली नागसेन जामनिक यांनी अध्यक्षपद भूषविले.युवक मंडळी तसेच गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संपूर्ण गावाची स्वच्छता करून प्लास्टिक गोळा करण्यात आले व गाव प्लास्टिक मुक्त केले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक गणेश दौलत जामनिक , रतनसिंग बाबुराव भगोरे, साहेबराव पुरुषोत्तम कावरे उपस्थित होते, तसेच स्वामी विवेकानंदन युवा मंडळाचे अध्यक्ष आशित जामनिक उपाध्यक्ष मिलिंद गवई सचिव प्रशांत नाकट तसेच सदस्य अक्षय जामनिक, अजय जामनिक, अमर जामनिक, स्वप्नील जामनिक ,ऋषिकेश ठोकळ ,जय जामनिक, प्रकाश जामनिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat