राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा होणार

Spread the love

कोरोना मुक्तीच्या लढ्यात योगदान देण्याचे राकॉ प्रदेश उपाध्यक्ष तथा विधान मंडळ समन्वयक संजय खोडके यांचे आवाहन

 

 

आषाढी एकादशी निमित्य ना.अजित पवारांना विधान मंडळात श्री. विठ्ठलाची प्रतिमा भेट…

 

 

प्रतिनिधी/लक्ष्मण राजुरकर

 

 

अमरावती २० जुलै : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे .

 

या निमित्ताने तथा आषाढी एकादशीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधान मंडळ समन्वयक संजय खोडके यांनी नामदार अजित पवार यांना विधानमंडळात श्री. विठ्ठलाची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या दीर्घायुष्याची मनोकामना केली . पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्राच्या जडण- घडणीमध्ये नामदार अजित पवार यांचे कार्य व कारकीर्द अशीच बहरत राहो , व त्यांना या कामासाठी सदैव शक्ती व ऊर्जा प्रदान होवो, यासाठी संजय खोडके यांनी श्री .विठूरायाला साकडे देखील घातले .

कोरोना पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार हे आपला २२ जुलै रोजीचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वानी कोरोना नियमांचे पालन करून महाराष्ट्राला कोरोना मुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे , असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तमाम कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे. तसेच कोरोनाचा धोका रोखण्यासाठी गर्दी टाळावी व वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम न घेता समाजउपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन देखील ना. अजितदादा पवार यांनी केले आहे.

या आवाहना नुसार राष्टवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधान मंडळ समन्वयक संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात येत्या २२ जुलै २०२१ रोजी नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्य अमरावती रायली प्लॉट स्थित अग्रसेन भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात वाढता रक्ताचा तुटवडा लक्षात घेता तसेच गरजू रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या रक्तदान चळवळीला अधिक वृदिंगत व गतिमान करणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या आयोजन व यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे , शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले , कार्याध्यक्ष प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे , महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे , महिला शहराध्यक्ष सुचिता वनवे , अमरावती विधानसभा अध्यक्ष धीरज श्रीवास, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश शर्मा , राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील गावंडे , जिल्हा राष्ट्रवादीचे ग्रामीण कार्याध्यक्ष भाष्कर ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे शरद देवरणकर , अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष वाहिद खान , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश हिवसे , ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रथमेश ठाकरे ,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढ्यात योगदान देण्यासाठी शहर व जिल्ह्यातील रक्तदात्यांची या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधान मंडळ समन्वयक संजय खोडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat