शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Spread the love

शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

 

 

 

शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची अधिकाऱ्यांना सूचना

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया/ लक्ष्मण राजुरकर

 

 

 

 

अमरावती तिवसा :- तिवसा तालुक्यातील मौजा निंभोरा शेत शिवारात बंधारा फुटून पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. बंधारा फुटून पुराचे पाणी थेट शेतात शिरुन कपाशी सह मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले. एकूणच आजूबाजूचे पिके पुरामुळे खरडून निघाली असुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. मंगळवारी रात्री पासुन परिसरातील झालेल्या मुसळधार पावसाने निंभोरा शेत शिवारात नदीकाठी असलेला बंधारा फुटून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले.

या नुकसानाची शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा देत तात्काळ मदतीची अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी माजी पं.स.सभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख आशिष धर्माळे,युवासेना जिल्हाप्रमुख स्वराज ठाकरे,युवासेना जिल्हा सचिव प्रविण दिधाते आदींनी या भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले गुरेढोरे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी त्यांनी केली. यावेळी शाखाप्रमुख सुनिल तालन,नंदकिशोर दिघडे,मधुकर गोरडे,दिपक दिघडे,रमेश थोटे,ज्ञानेश्वर दिघडे,सुदाम पुनसे,सुभाष राठी,माधव पुनसे,संजय निघोंट आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat