नाशिक पुणे” महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात अज्ञात मोटारीने नर बिबट्याचा मृत्यू…

Spread the love

“नाशिक पुणे” महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात अज्ञात मोटारीने नर बिबट्याचा मृत्यू…

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया /ज्ञानेश्वर गायकर पाटील

 

 

अहमदनगर /संगमनेर :-  आज पहाटे तीन च्या सुमारास अज्ञात वाहनाने पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरात ,रस्ता ओलांडणाऱ्या दहा वर्षीय नर बिबट्याला जोराची धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. या परिसरात बिबट्यांचा वावर कायम असतो. साकुर ,जांबूत, कोठे, वणकुटे परिसरातील जंगल ही वाघांची लपवणुक आहे. रात्रीच्या वेळी हे बिबटे मुळा नदी परिसरात शिकारी करिता येत असतात. कुत्रे, बकरे, कोंबड्या आदी खाद्य त्यांना या परिसरात मिळत असते. शेजारील ब्राह्मण वाडा परिसरातील अनेक जंगलात बिबट्यांची वस्ती आहे. येथील शेतकरी यांना या बिबट्यांची सवय असल्याने , ते पाळीव प्राणी यांच्या संरक्षण ची अधिक काळजी घेतात.डोंगर दऱ्या मध्ये शिकार मिळत नसल्याने ,सदर बिबटे हाय वे लगत च्या गावांचा भक्ष शोधण्यास आसरा घेतात. यात मुळा नदी काठी त्यांना भक्ष शोधणे सोपे जात असल्याने ,बिबटे महामार्ग ओलांडताना नेहमी दिसतात. बिबटे सह तरस , कोल्हे कायमच महामार्गावर दिसत असल्याचे चित्र आहे.

आज पहाटे असाच एका बिबट्याचा मृत्यू झाला.सदर बिबट्या रस्ता ओलांडत असताना मोठ्या वाहनाने बिबट्याला धडक दिली असावी ,असा प्राथमिक अंदाज वनाधिकारी यांनी व्यक्त केला. काही जागरूक नागरिकांनी घारगाव पोलीस स्टेशन ला याची कल्पना दिली, त्यांनी व वनाधिकारी, वन मजूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पशु वैद्यकिय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून ,वन अधिकारी यांनी बिबट्याचे अंतिम संस्कार चंदनपुरी रोप वटिकेत केले आहे. वन अधिकारी योगिता पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat