बसपाचे सुनील राक्षसकर यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश 

Spread the love

बसपाचे सुनील राक्षसकर यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

 

तालुका प्रतिनिधी /रत्नदिप तंतरपाळे

 

अमरावती /चांदूर बाजार (कृष्णापुर) :- अमरावती येथे वंचित बहुजन आघाडी च्या संवाद मेळाव्यात रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थित सुनील राक्षसकर यांचा जाहीर प्रवेश.

अमरावती येथे वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या संवाद मिळाव्यात बी. एस. पी. चे सुनील राक्षसकर यांनी जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई जिल्हा नेते रामजी राठोड विपीन अनोकार यांच्या मार्गदर्शनात प्रवेश घेतला.

सुनील राक्षसकर हे सातत्याने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहतात तसेच काँग्रेसच्या तिकीटवर पंचायत समिती तथा जिल्हा परिषद निवडणूक लढवली पुढे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेब आंबेडकरांच व्हिजन जनमाणसात पोचलं पाहिजे ती भूमिका घेऊन ही कटिबद्धता दाखवत येणाऱ्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांमध्ये या जिल्ह्यामध्ये नवीन भूमिका नवीन वलय निर्माण करण्यासाठी सुनील राक्षसकर यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना ते म्हणाले आमच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये आंबेडकरी चळवळीला मोठ करण्याची ताकद फक्त श्रध्देय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यातच आहे हा विचार येणारा काळ हा सत्तेच्या समीकरणाचा असेल असे माध्यमांशी बोलताना सांगितले. वंचित बहुजन आघाडी चे प्रसिद्धीप्रमुख संघप्रिय वानखडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat