Hitesha leaves Bengaluru after her address leaked

Spread the love

[ad_1]

मुंबई : झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉय प्रकरणात एक नवं वळणं आलंय. तक्रारदार मॉडेल हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) ने बंगलुरू सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हितेशाने सोशल मीडियावर आपल्या घरचा पत्ता लीक झाल्यामुळे तिने हा घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे (Model Hitesha leave Bengaluru) . सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

हितेशाने इंस्टाग्रामवरून आरोप करणारा व्हिडिओ शेअर केला होता. ऑर्डर घेण्यास नकार दिल्यामुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयने तिला मारहाण केल्याचा आरोप मॉडेलने केला होता. या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. अगदी बॉलिवूड कलाकारांनी देखील यामध्ये प्रतिक्रिया दिली होती. (Zomato Delivery प्रकरणात, डिलीव्हरी बॉयला मोठा दिलासा) 

 

हितेशाने या कारणामुळे सोडलं बंगलुरू 

द न्यूज मिनटच्या रिपोर्टनुसार, बंगलुरू इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात इंस्पेक्टर अनिल कुमार यांनी म्हटलं आहे की,’जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा कुणीच दरवाजा उघडला नाही.’ तसेच दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशा बंगलुरूत राहण्यासाठी घाबरत होती. कारण लोकं एफआयआरबद्दल बोलत असून त्यांच्या घरी येणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये हितेशाचा बंगलुरूचा पत्ता सांगितला जात आहे. (Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत) 

अखेर व्हीडिओ सोशल मीडियावरुन हटवला

या मॉडलने आरोप केला होता की डिलीव्हरी बॅायने Delivery उशीला केल्यामुळे, त्यांच्यात वाद झाला आणि त्यामुळे डिलीव्हरी बॅाय कामराजने तिच्यावर हल्ला केला. मात्र एका पोलिस अधिकाऱ्यांच्या वक्तव्यानुसार डिलीव्हरी बॅायच्या तक्रारीनंतर हितेशा चंद्राणीच्या विरोधात कारवाई केली गेली आणि त्याने हे ही सांगितले की, डिलीव्हरी बॅाय कामराजने असे ही म्हंटले, 9 मार्च रोजी हितेशानेच त्याला चपलीने मारले होते आणि त्याला शिव्यासुद्धा दिल्या होत्या. (Zomato डिलिव्हरी बॉय प्रकरणात नवं वळण, मॉडेलच्या अडचणीत वाढ) 

 

डिलिवरी बॉय काय म्हणाला?

कामराजने सांगितले, “मी दोन वर्षापेक्षा अधिक काळापासुन मी हे काम करत आहे आणि मला प्रथमच अशा प्रकारे वागणूक देण्यात आली”. तो म्हणाला की, “हितिशाने Delivery घेतली आणि ऑर्डरचे पैसे देण्यास नकार दिला. ती झोमाटो चॅट सपोर्टशी बोलत होती.

मी तिला पैसे देण्यास सांगितले तेव्हा तिने नकार दिला आणि मला गुलाम बोलली…ती एवढ्यावरच न थांबता आरडाओरडा करु लागली आणि म्हणाली तू काय करू शकतोस? झोमाटो सपोर्टने मला सांगितले आहे की माझी ऑर्डर रद्द झाली आहे.”

“म्हणून मग मी तिला Food परत करण्यास सांगितले, परंतु तिने मला नकार दिला. यानंतर मी Food न घेताच परत जाण्याचा निर्णय घेतला आणि लिफ्टच्या दिशेने जाऊ लागलो. तेव्हा मला ती हिंदीमध्ये शिव्या देऊ लागली आणि मला चप्पलने मारहाण करायला लागली.

महिलेचा हल्ला टाळण्यासाठी मी माझ्या हाताने माझा बचाव केला. तेव्हा ती माझा हात हटवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिचाच हात तिला लागला आणि तिच्या हातात असलेली अंगठी तिच्या नाकाला लागली आणि तिच्या नाकातून रक्त यायला लागले.”

डिलीव्हरी बॅाय कामराजचे वक्तव्य एकल्यानंतर पोलिसांनी हितेशावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता लवकरच पोलिस सगळ्या गोष्टींची शहाणीशा करुन सत्य समोर आणतील आणि कामराजला न्याय आणि त्याची नोकरी परत मिळेल. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat