Home Appliances AC, Fridge, Electronic Goods Price Will Increse from April

Spread the love

[ad_1]

मुंबई : उन्हाळा दार ठोठावू लागलाय. या उन्हाळ्यात तुम्ही एअर कंडीशनर, फ्रीज किंवा आणखी कोणतं इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करु इच्छित असाल तर तात्काळ करा. कारण अनेक कंपन्या आपल्या वस्तूंच्या किंमती वाढवणार आहेत. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 

LED टीव्ही 35 टक्के महागला 

एलईडी टीव्ही (LED TV) च्या किंमती (LED TV price) एप्रिलपासून वाढू शकतात. गेल्या महिन्यात ओपन-सेल पॅनल ग्लोबल मार्केटमध्ये एलईडी टीव्ही 35 टक्क्यांपर्यत महागले आहेत. पॅनासॉनिक, हायर आणि थॉमसन सारख्या ब्रॅण्डच्या किंमती वाढू शकतात. 

एप्रिलच्या महिन्यात टेलिव्हिजनच्या किंमती दोन ते तीन हजारांनी वाढू शकतात. सप्लायमध्ये कमी आणि अन्य कारणांमुळे टीव्ही पॅनलच्या किंमती सलग वाढत आहेत. आणि दुप्पट पेक्षा जास्त किंमतीपर्यंत पोहोचल्या आहेत.

याशिवाय कस्टम ड्युटीमध्ये वाढ, महाग झालेल्या कॉपर (copper), एल्युमिनियम ( aluminium) आणि स्टील सारख्या मटेरीयलमुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. समुद्री-हवाई मार्गाचे भाडे वाढल्याने देखील टीव्हीच्या किंमती सलग वाढत आहेत. 

उत्पादन खर्च वाढल्याने कंपन्यांनी प्रोडक्टचे दर एप्रिलपासून वाढवण्याचा निर्णय घेतलाय. याआधी जानेवारीमध्ये कंपन्यांनी एप्लायंसेसच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ केली होती.

महागणार एसी आणि पंखा 

एसी बनवणाऱ्या कंपन्या दरात 4 ते 6 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत आहेत. तांब्याचा (Coper) दर विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे एसी, फ्रिज, कुलर, फॅन यासारख्या वस्तूंच्या उत्पादनाची किंमत वाढली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात त्यांच्या किंमती उसळी घेतील. तांबे महाग झाल्यामुळे चाहते बनविण्याची किंमत वाढली आहे, ज्यामुळे पंखांची किंमत देखील वाढू शकते.

पॅनासोनिक कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण एशिया) मनीष शर्मा म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्समध्ये होणारी वाढ ही स्टॉक क्लिअर करण्यासहीत ग्राहक वाढवण्यासाठी तसेच ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी कंपन्या ऑफर देत आहेत. तरीही पुढच्या महिन्यापासून किंमतीत बदल पाहायला मिळेल. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat