Ind vs eng T20 4th match virat kohli give chance to suryakumar yadav News in Marathi

Spread the love

[ad_1]

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20चा आज चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाला हा सामना आपल्या हातून गमवणं चांगलंच महागात पडू शकतं. याचं कारण म्हणजे इंग्लंड संघ 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-1ने पुढे आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड संघात काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे.

मागचे तिन्ही सामने फ्लॉप असलेल्या के एल राहुलला यावेळी संघाबाहेर विराट कोहली ठेवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिले दोन सामने रोहित शर्मा खेळला नव्हता मात्र तिसऱ्या सामन्यात त्यानं कम बॅक केलं. तर ऋषभ पंतनेही चांगली कामगिरी केली मात्र विराट कोहलीच्या चुकीच्या निर्णयाचा त्याला फटका बसला. आता आधीच्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या चुका विराट कोहलीला भरून काढाव्या लागणार आहेत. तरच ही मालिका भारतीय संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकते.

तिसर्‍या टी -20 च्या कामगिरीवर आणि चौथ्या टी -20 च्या महत्त्वच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय विराट कोहलीला घ्यावे लागू शकतात. के एल राहुलला तीन सामन्यांत केवळ 1 रन करण्यात यश आलं आहे. त्याचा फॉर्म चांगला चालला नाही. त्यामुळे भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघात आता संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. 

सूर्यकुमार यादवला दुसऱ्या टी 20 सामन्यात संधी देण्यात आली मात्र खेळवलं गेलं नाही. तर तिसऱ्या टी 20 सामन्यात प्लेइंग इलेवनमधून पुन्हा बाहेर करण्यात आलं. के एल राहुलची कामगिरी लाजीरवाणी ठरल्यानं आता विराट कोहली त्याला चौथ्या सामन्याच्या प्लेइंग इलेवनमधून बाहेर करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

चौथ्या टी 20 सामन्यामध्ये के एल राहुल ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. त्याला साथ रोहित शर्मा देईल. तिसऱ्या नंबरवर कर्णधार विराट कोहली उतरेल. त्यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल अशी टीम मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर युजवेंद्र चहल ऐवजी अक्षर पटेलला गोलंदाजीसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. चहलने तिन्ही सामन्यांमध्ये विशेष कामगिरी न केल्यानं हा निर्णय घेतला जाऊ शकतो. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat