mahendrasing dhoni new photo viral on social media News in Marathi

Spread the love

[ad_1]

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि CSKचा स्टार खेळाडू महेंद्र सिंह धोनी सध्या आपल्या स्टाइलमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. माहीचा काही दिवसांपूर्वी बौद्ध भिक्षुच्या अवतारातील फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. त्याच्या या लूकवर नेटकरी आणि क्रिकेटप्रेमी खूप संतापले आहेत. 

नेमकं काय आहे या लूकमध्ये?
माहीच्या डोक्यावर मलिंगासारखी हेअरस्टाईल केली आहे. त्याच्या या न्यू हेअरकटमुळे तो सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. धोनीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबद्दल धोनीचे चाहते खूपच चिडले आहेत. 

यावेळी धोनीच्या ‘मलिंगा’ लूकचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एमएस धोनीच्या मलिंगा लूकचा हा फोटो # CWC11Rwwind ‘नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. हा माही ‘हेलिकॉप्टर शॉट्स, स्लिप कॅचेस, डिपिंग यॉर्कर, तो सर्व काही करू शकतो. हा आहे एमएस मलिंगा’

धोनीच्या या लूकवर चाहते मात्र खूप वैतागले असून हा फोटो काढून टाकण्याची मागणी अनेकांनी व्यक्त केली आहे. काहींनी तर या फोटोवर टीकात्मक कमेंट्स केल्या असून संताप व्यक्त केला आहे. बौद्ध भिक्षुनंतर आता धोनीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. 

 [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat