माणिकगड कंपनी खिशातील कामगार युनियनच्या दबंग गिरी चा पर्दाफाश करा   

Spread the love

माणिकगड कंपनी खिशातील कामगार युनियनच्या दबंग गिरी चा पर्दाफाश करा   

 

 

कोरपना तालुक्यातील बहुचर्चित माणिकगड सिमेंट कंपनी नव्याने हस्तांतरित अल्ट्राटेक बिर्ला

 

 

M marathi news media/मोबिन बेग 

 

 

चंद्रपूर/ कोरपना: समूहाच्या गडचांदूर स्थित सिमेंट कंपनी अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे जमीन प्रकरण पाणी रस्ता नियमबाह्य जमीन खरेदी असे अनेक वाद चर्चेत असताना गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट कंपनी ने कामगाराच्या मूलभूत अधिकार पायदळी तुडवत स्वतःच्या हाताचे बाहुले बनून काम करणाऱ्या कामगार युनियन यांना चालना देत बि डी सिंग च्या नेतृत्वात येथील तत्कालीन युनिट हेड राजेंद्र जी काबरा यांच्या मिलीभगत ने अनेक वर्षापासून या ठिकाणी कामगारांचे शोषण होत असताना कामगारांमध्ये सतत फूट पाडून आपल्या सूत्राने चालणाऱ्या सिंग नामक व्यक्तीच्या नेतृत्वात कामगार युनियन देऊन कामगारांची गळचेपी केल्या जात असल्याचे अनेक तक्रारी व आरोप कामगारांनी केले आहे या ठिकाणी कामगार युनियन प्रमुखाने अनेक गुन्हेगारी अपराध घडविले अनेक आर्थिक घोटाळे केल्या गेले यावर पडदा पाडण्यासाठी राजेंद्र जी काबरा प्रकरण उघड होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न करून युनियन अध्यक्षाला प्रत्यक्षात मदत करण्याचा विडा उचलला आहे कंपनीच्या नियमाने व कामगार धोरणानुसार गेल्या अनेक वर्षापासून वार्षिक सर्वसाधारण सभा झालेल्या नाही कामगार सभेत झालेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली नाही प्रॉव्हिडंट फंड भविष्य निर्वाह निधी इत्यादीच्या नोंदी व कामगारांच्या हिताचे कोणतेही धोरण राबवले गेले नाही यामुळे कामगारांचे शोषण आर्थिक घोटाळे याठिकाणी करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी असताना सहाय्यक कामगार आयुक्त कामगाराच्या मानव अधिकाराचे खुले आम हनन केल्या जात असताना कारवाई करण्याकडे दिरंगाई केल्या जात आहे कंपनीचे युनिट हेड राजेंद्र काबरा यांनी यापूर्वी कंपनी निर्मित युनियनच्या अध्यक्षाला हाताशी धरून आदिवासीचे आंदोलन दडपण्यासाठी कामगारांचा वापर केला आदिवासीं कुटुंबाचा छळ दबंग गिरी व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न कामगारांचा वापर करून करण्यात आला होता शेतकरी व कामगारांच्या संविधानिक अधिकाराची या ठिकाणी अवहेलना केल्या जात आहे.

कामगाराच्या मूलभूत अधिकारावर गदा आणून भविष्य निर्वाह निधी चा मोठा घोटाळा या ठिकाणी झाला असून यांची पाठराखण करण्याचं काम कंपनी व्यवस्थापन करीत असल्यामुळे कामगारांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे सहाय्यक कामगार आयुक्त पोलीस प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नावर गंभीर होऊन चौकशी व कारवाई करावी अन्यथा कामगार आदिवासी शेतकरी जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने कंपनी गेट पुढे आंदोलन करण्याचा इशारा आबिद अली यांनी दिला आहेे. कामगारांमध्ये मोठा असंतोष खदखदत असून कामगार युनियन च्या दबंग गिरी चा पर्दाफाश करावा अशी मागणी करण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat