पुरग्रस्ताच्या मदतीला आता औसा “मनसे” सरसावली !

Spread the love

पुरग्रस्ताच्या मदतीला आता औसा “मनसे” सरसावली !

 

 

प्रतिनिधी/बाबुराव आगलावे

लातूर/औसा :- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान करताच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसाच्या वतीने सर्व आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत औसा शहरात बैठक घेण्यात आली.

या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करताच शहराध्यक्ष मुकेश देशमाने यांनी 11000 रु. रोख 25 किलो गहू व 25 किलो तांदूळ, तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे 5000 रू 5 कट्टे गहू, श्री सायन्स क्लासेस औसा 15 बॉक्स पाणी, बॉटल धनराज गिरी टाका 100 किलो तांदूळ, संतोष गावकरी किल्लारी 50 किलो गहू, वरूण देशपांडे औसा 25 किलो गहू पंचवीस किलो तांदूळ,अनिल बिराजदार दावतपूर 25 किलो गहू, विकास भोजने हिपरगा 25 किलो गहू,हनुमंत येणगे बुधोडा 50 किलो गहू, सोहेल शेख औसा पंधरा किलो गहू आट्टा, इत्यादी उपस्थिता पदाधिकार्यानी अन्नधान्याच्या व जीवनावश्यक वस्तूच्या स्वरूपात मदत देण्याचे जाहीर केले.

तसेच वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर मदत जमा करण्यासाठी शहरासह तालुक्यात चार चाकी वाहन उद्या दि.28/ जुलै रोजी सकाळी 9 वा.पासुन मदत रथ म्हणून औसा शहरात फिरविण्यात येणार आहे.

तरी समाजातील इच्छुक व दानशूर व्यक्तीने घडेल त्या स्वरूपात मदत रथ आपल्या दारात गल्लीत भागात व गावात आल्यास त्या ठिकाणी मदत जमा करावी. 

आपल्या कडून आलेली मदत व पदाधिकाऱ्यांनी केलेली मदत एकत्र जमा करून दिनांक 2 ऑगस्ट रोजी हा मदतीचा रथ पदाधिकाऱ्यांसह कोकणात पोहचेल व 3 ऑगस्ट रोजी सदरील मदत पूरग्रस्त बांधवांना वाटप करण्यात येईल याची नोंद घेऊन दानशूर व्यक्तीनी मोठ्या प्रमाणात मदत जमा करावी हि विनंती,या बैठकीस पंचायत समिती औसाच्या सदस्या सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे, तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे,शहराध्यक्ष मुकेश देशमाने यांच्यासह महेश बनसोडे, धनराज गिरी, प्रशांत जोगदंड, अमोल थोरात, वरुण देशपांडे, जीवन जंगाले, सतीश जंगाले, महादेव गुरुशेट्टे, उमकांत गोरे,प्रकाश भोंग, अतीक शेख, सोहेल शेख, अमोल परिहार, विकास लांडगे, तानाजी गरड, हनुमंत येणगे, गोविंद चव्हाण, प्रल्हाद शिरसागर, समाधान फुटाने,गणेश काळे, दशरथ ठाकूर, विकास भोजने इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वरील सर्व पदाधिकारी येणारे सात दिवस सतत या सेवेत राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat