पारनेरच्या वादग्रस्त “ऑडियो क्लिप ” तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव जिल्ह्यात बदली…

Spread the love

पारनेरच्या वादग्रस्त “ऑडियो क्लिप ” तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव जिल्ह्यात बदली…

 

 

 

M marathi news/ ज्ञानेश्वर गायकर पाटील

 

 

 

अहमदनगर/संगमनेर :- राज्यभर गाजलेल्या ,”आत्महत्या ऑडियो क्लिप” पारनेर तालुका तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांची जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे. अश्या प्रकारचे आदेश महाराष्ट्र सरकार ने जारी केले आहेत.

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस चे जागतिक कीर्ती प्राप्त केलेले आमदार निलेश लंके यांच्यावर त्यांनी काही अप्रत्यक्ष आरोप केले होते.या बरोबर त्यांनी पोलीस अधिकारी, वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्या वर ही आरोप केले होते. सदर आरोपाची विभागीय आयुक्त पातळीवर महिला प्रतिनिधी कडून चौकशी करण्यात आली असता, यात तथ्य नसल्याचे निदर्शनास आले होते.

अखेर त्यांची राज्य सरकार ने जळगाव येथे बदली केली आहे. ज्योती देवरे यांच्या कार्यपद्धती वर महसूल कर्मचारी यांनी ही जोरदार आंदोलन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय आमदार निलेश लंके यांच्या कडे त्यांनी बोट दाखवलेले होते ,या बाबत जनतेमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत होती. चौकशी अंती यात काही ही तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. एक महिला महणून त्यांना ही समाजात सहानभुती प्राप्त झाली होती. भाजप ने या सर्व बाबीचा राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्यांना अखेर यात यश आले नाही. निलेश लंके यांची कामकाज पद्धत विशेष प्रभावी आसून ,जिल्ह्यात त्यांना भावी खासदार म्हणून पाहिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat