मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा सर्वसामान्य जनतेचा होता

Spread the love

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा सर्वसामान्य जनतेचा होता

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम व्याख्यान – बुबासाहेब जाधव यांचे प्रतिपादन

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया

 

 

तुळजापूर,दि.१७, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हैदराबाद मुक्तिसंग्राम : गाथा आणि संघर्ष या विषयावर आधारित बुबासाहेब जाधव, जेष्ठ विचारवंत चिलवडी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले.आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना ते पुढे म्हणाले की मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा हा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नव्हता.तो लढा एका अन्यायकारी प्रशासना विरुद्ध होता. निजामशाही ही भारताच्या मध्य भागी होती, आणि निजामाला बरोबर भारताच्या मध्यभागात आपल्या धर्मावर आधारित एक नवीन राज्य स्थापीत करावयाचे होते.आपल्यातीलच कांहीं लोक लाचार झाले होते.आपला पराभव लाचार लोकांमुळेच झाला होता.

निजामाच्या संस्थानात १३८ शहरे होती.त्यांची कार्यालयीन भाषा ही उर्दू होती.औरंगजेबा नंतर मोगलशाही खिळखिळी झाली होती,कमरुद्दिन नावाचा प्रथम निजाम होता तर मिर उस्मान अली शेवटचा निजाम ठरला.१३ सप्टेंबर १९४८ रोजी रात्री १:३०. वाजता भारत सरकारच्या आदेशानुसार मोहीम सुरू झाली होती तब्बल १०९ तासांच्या लष्करी कारवाई नंतर निजाम शरण आला होता.आज तरुण पिढिने हा मुक्तिसंग्रामाचा लढा अभ्यासण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आधुनिक काळातील पिढीला हैदराबाद मुक्तिसंग्राम बाबत माहिती असणे गरजेचे आहे.हा लढा सामाजिक ऐक्याची भावना वाढवणारा लढा होता ही बाब समजून घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते तसेच प्रशासकीय निर्देशानुसार प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले..

या कार्यक्रमाप्रसंगी तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य दौंड तसेच शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक वागतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ एस एम देशमुख,प्रा धनंजय लोंढे,प्रा.ए.बी वसेकर ,प्रा विवेक कोरे,प्रा डॉ विलास गुंडपाटील यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे बी क्षीरसागर यांनी तर आभार प्रा व्ही एच चव्हाण यांनी मानले.कार्यक्रमाप्रसंगी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat