राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मुर्तिजापुरच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर 

Spread the love

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मुर्तिजापुरच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

 

 

अकोला / मूर्तिजापूर  :  राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मूर्तिजापूर वतीने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती ,भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व ओबीसी संविधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण) आणि हक्क- अधिकार संपविणा-या धोरणाच्या, व शासन आदेशांच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी, कामगार कायदे विरोधी, विद्यार्थी विरोधी, शिक्षणक्षेत्रातील खाजगीकरण, कंत्राटी पद्धती, शिक्षण सेवक, सीएचबी, अंगणवाडी सेविका , नवीन पेंशन योजना, रोस्टर अंमल बजावणी इत्यांदी १४ मुद्यांवर शासनाच्या बहुजन विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालया समोर आंदोलन पार पडले .

पद्दोन्नतितील आरक्षणाविषयी शासनाने दि. १८ फेब्रूवारी, २० एप्रिल व ७ में २०२१ रोजी काढलेल्या शासन निर्णय हा बहुजन विरोधी ,संविधान विरोधी तसेच सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचे अवमानना करनारा आहे. पदोन्नतिच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व १०० टक्के पदे खुल्या प्रवर्गातुन व सेवाजेष्ठता नुसार भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तो निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमानना आहे .तसेच या आदेशाने महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जाती – जमाती,भटके विमुक्त ,विशेष माँगास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय यांना संविधानीक अधिकार नाकारून त्यांचा सुद्धा अपमान व अवहेलना आणि मानहानी शासन या कृतीतून करीत आहे.

सदरील आदेश दुरुस्त करून ३३ टक्के पदोन्नतितील आरक्षण मुद्द्यावर सर्व बिंदु समाविष्ट करावे त्याचप्रमाणे एससी,एसटी,एनटी,व्हीजे एनटी ,एसबीसी,ओबीसी यांची पद्दोन्नतिची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी, याकरीता या सर्व बहुजन विरोधी धोरणामुळे बहुजनाचे संविधानीक प्रतिनिधित्व आरक्षण व मूलभूत हक़्क़ अधिकार संपविले जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या अनुसूचित जाती – जमाती,निर अधिसूचित जाती,भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवाच्या विरोधातील धोरणाच्या आणि शासन आदेशाच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनाच्या वतीने राज्यस्तरीय चरणबद्ध ”

प्रतिनिधित्व (आरक्षण)बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलनाचा तिसऱ्या टप्प्यातील साेमवार दि .१९ जूलै २०२१‌ ला तहसील कार्यालयासमोर आंदोलन आयोजित करण्यांत आले होते,

तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रविणा भटकर ,देवानंद शेंडे , सुषमा गवारगुरू , पुरुषोत्तम बाभूळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat