बहुजन मुक्ती पार्टी मुर्तिजापूरच्या वतीने अनोखे आंदोलन 

Spread the love

बहुजन मुक्ती पार्टी मुर्तिजापूरच्या वतीने अनोखे आंदोलन 

 

वाढत्या वीज बिलाचे विरोधात सरकारला दिला कंदील भेट

 

 

अकोला / मुर्तिजापूर – गेल्या एक ते दीड वर्षपासून संपुर्ण जगावर आलेली परिस्थिती, गगनाला भिडलेली दरवाढ अशातच सर्व सामान्य माणसांनी जगावं कस असा भला मोठा गंभीर प्रश्न उभा असताना यामध्ये वीज बिल भरणेसाठी होत असलेली सक्ती आणि वीज बिलामध्ये केलेली दरवाढ याचा निषेध करत मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कंदील भेट आंदोलन करण्यात आले एकीकडे जनता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे संकटात सापडली आहे..

दुसरीकडे महागाईने गगनभरारी घेतली असता सरकारने वीज बिल माफ करण्याऐवजी वीज पुरवठा खंडित करून शेतकरी ,घरगुती वीज कनेक्शन धारक ,दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांची गळचेपीच करत आहे याकरिता दिनांक ६ जुलै २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कंदील भेट आंदोलन करण्यात आले उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सदर प्रमुख मागण्या करण्यात आल्या १) दोनशे युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे २) मीटर भाडे कपात करण्यात यावे ३) विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी ४) सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी ५) ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च २०२० पासून भरले त्यांचे साठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीज बिल निल पाठवावे ६) ३० दिवसानंतर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यापद्धतीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी प्रविणा भटकर,लता गुजर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat