लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात नगरपरिषदेचा सिंहाचा वाटा नगराध्यक्ष सचिन रोचकरी.मंठाळकर मंगल कार्यालयातील स्मार्ट लसीकरणात विक्रम ३५१ लसीकरण

Spread the love

*लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात नगरपरिषदेचा सिंहाचा वाटा नगराध्यक्ष सचिन रोचकरी*
________________________________

*मंठाळकर मंगल कार्यालयातील स्मार्ट लसीकरणात विक्रम ३५१ लसीकरण*
________________________________
तुळजापूर- दिनांक (७ जुलै) तुळजापूर शहरातील व परिसरातील लसीकरण यशस्वी करण्यामध्ये नगरपालिकेचा सिंहाचा वाटा असून यामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सर्व नगरसेवक सर्व अधिकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या प्रयत्नातून तुळजापूर शहरातील लसीकरण मोहीम जिल्ह्यातील सर्वश्रेष्ठ मोहीम ठरीत आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांचाही महत्त्वाची भूमिका आहे. लस प्रत्येकाला मिळावी या उदात्त हेतूने प्रत्येक वार्डात लसीकरण शिबिर घेण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आणि आज खऱ्या अर्थाने त्या सर्व प्रयत्नांना यश प्राप्त झाले.
त्याबद्दल नगरपरिषद ,उपजिल्हा रुग्णालय व सर्व नागरिकांचे अभिनंदन व आभार यापुढील काळातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे मत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी व्यक्त केले ते
नगरपरिषद तुळजापूर व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापूर येथील प्रभाग क्रमांक १० मधील मंठाळकर मंगल कार्यालयातील स्मार्ट लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे ,नगरसेवक अमर मगर, नगरसेविका अश्विनी रोचकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, पत्रकार गुरुनाथ बडुरे, शत्रुघन पवार, अनिल आगलावे , उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ. दिगंबर कमठाणे, नवनाथ खंडागळे, अधिपरिचारिका सुलक्षणा मोरे, डॉ.हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे , अश्विनी शिंदे, वैशाली धरणे, शारदा बडूरे, राजेश शिंदे दिलीप मगर सदानंद राव, धर्मेंद्र कावरे , श्रीशैल्य पाटील, देविदास धट, विशाल गंगणे, नितीन जाधव श्रीनाथ शिंदे,नगरपालिकेचेकेचे कर निरीक्षक वैभव कुमार अंधारे, गणेश रोचकरी, महेंद्र पाटील, नागेश काळे, जयजयराम माने ,न. प .शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक बाळासाहेब जेटीथोर, सुरजमल शेटे सुभाष राठोड उपस्थित होते.
याच कार्यक्रमामध्ये तुळजापूर शहरातील सेवानिवृत्त बँक कर्मचारी नंदकुमार कुतवळ बाळासाहेब अरविंद ठोंबरे संजय कांबळे राजेंद्र घाडगे डॉ. आनंद मुळे यांचा व उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण शिबिरात सहभागी सर्व कर्मचारी तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील टीम या सर्वांचा सन्मान संयोजक विशाल रोचकरी यांच्या वतीने शाल ,फेटा, बुके व आई तुळजाभवानी ची प्रतिमा देऊन करण्यात आला.
सदरील शिबिरात विक्रमी ३५१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात संयोजक विशाल रोचकरी यांनी शिबिर आयोजनाचा हेतू स्पष्ट करून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक अमर मगर, यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कावरे यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले.
लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी हिबारे नाना, नितीन जाधव, विशाल गंगणे,सादु कोळेकर, सोनू शिराळकर, सहदेव कोळेकर, कुमारी वरदायनी, रोचकरी कुमारी गार्गी कावरे तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील जयप्रकाश हिरेपट ,मधुकर पवार ,पवन सागवे , पार्वती चव्हाण ,आलीशिबा अडसूळ, मुक्ताबाई माने, लक्ष्मीबाई काकडे, रेखा पडवळ, पठाण .एल .एम ,गालफाडे बालाजी, शिवकन्या कांदे ,अभंग सिस्टर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat