ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्षपदी पांडागळे तर उपाध्यक्षपदी रोंगे यांची निवड .

Spread the love

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्षपदी पांडागळे तर उपाध्यक्षपदी रोंगे यांची निवड .

तुळजापूर प्रतिनिधी :ऑल इंडिया पॅंथर सेना या संघटनेची बैठक नुकतीच पार पडली त्यामध्ये तुळजापूर तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी इच्छुकांची गर्दी होती राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना दीपक केदार यांच्या आदेशावरून उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे यांनी तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष या दोन्ही पदाच्या निवडी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये तालुका अध्यक्षपदी चेतन पांडागळे तर तालुका उपाध्यक्ष पदी कुणाल रोंगे या दोघांची वर्णी लागली आहे .जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे यांनी सदर निवडीचे पत्र देण्यात आले आहे .व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत .यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कसबे व जिल्हा युवक अध्यक्ष यशपाल गायकवाड रोहित सोनवणे श्रीराम पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat