अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करुन कास्तकारांना तातडीने नुकसान भरपाई द्या ! 

Spread the love

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करुन कास्तकारांना तातडीने नुकसान भरपाई द्या !

आपच्या पदाधिका-यांनी केली मागणी

 

 

राजूरा – संपुर्ण राजुरा तालुक्यात दि. 21,22 व 23 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापुस व तूर या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने पन्नास हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी राजुरा तहसीलदार यांच्यामार्फत आम आदमी पार्टीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यावर्षी शेतात बहरलेल्या पिकाला पाहुन शेतकऱ्यांच्या मनात आनंद बहरला हाेता परंतु आता सर्वत्र उध्वस्त झालेल्या पिकाकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु येत आहे. सोयाबीन, कापूस, तुरी यांच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांनी मोठा खर्च केला. त्यानंतर खते, औषधी फवारणी यासाठी कर्ज करून शेतकर्‍यांनी पिकांची जोपासना केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांवर अक्षरशा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता परत शेतकर्‍यांना या दुःखातुन सावरण्यासाठी शासनाने राजुरा तालुक्यातील सर्व गावात जाऊन त्वरित पंचनामे करुन हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राजुरा तालुका आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जेष्ठ नेते मिलिंद गडमवार, विधानसभा अध्यक्ष प्रदीप बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुकाध्यक्ष रोशन येवले, शेतकरी जिल्हा आघाडी अध्यक्ष अरविंद वांढरे, स्वप्निल कोहपरे, संगठनमंत्री पवन ताकसांडे, संतोष तोगर, सुरेश लोखंडे, तुळशीराम किंनाके, विलास निमलवार, श्रीकांत नकलवार, विजय कामपल्लीवार, युवा आघाडीचे अध्यक्ष प्रदीप चांदेकर, मधुकर हजारे, अविनाश सातपुते, कवडु येकोनकर, व्यंकु मडावी, मारोती आत्राम आदींनी तहसीलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat