घुग्गुस मध्ये चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांनी केला अवैध रेतीचा ट्रँक्टर जप्त -दंडात्मक कारवाई करणार !

Spread the love

घुग्गुस मध्ये चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांनी केला अवैध रेतीचा ट्रँक्टर जप्त -दंडात्मक कारवाई करणार !

 

 

 

घुग्गुस चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील काही रेती घाट लिलाव झाले असले तरी जिल्ह्यातील ब-याच ठिकाणचे रेती घाट अद्याप लिलाव झाले नाही .अश्यातच काही रेती तस्कर याच रेती घाटावरुन अवैध रित्या रेती नेत असल्याचे समजते. चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस जवळील एका रेती घाटावरुन अवैध रित्या रेती वाहतुक करतांना चंद्रपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश गाैंड यांनी एका ट्रँक्टरला नुकतेच पकडले त्यात रेती आढळुन आली .वाहन चालकास त्यांनी रेती वाहतुक संदर्भातील कागद पत्रांची विचारणा केली असतांना त्याचे जवळ कुठलाही रेती परवाना आढळुन आला नाही .लगेच त्यांनी ताे ट्रैक्टर घुग्गुस नायब तहसीलदार कार्यालयात जमा केला . आता ते सदरहु टैक्टर मालकावर दंडात्मक कारवाई करेल .या अगाेदर चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांनी याच घुग्गुस परिसरात माेठ्या प्रमाणात अवैध गाैण खनिज नेणां-या वाहनांवर कारवायां केल्या हे येथे उल्लेखनीय आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat