अखेर सोंडो येथील आरोपींच्या गुन्ह्यात वाढ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

Spread the love

अखेर सोंडो येथील आरोपींच्या गुन्ह्यात वाढ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

 

 

 

 

 

 म मराठी न्यूज मिडिया चंद्रपूर

 

राजुरा : तालुक्यातील विरुर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या सोंडो येथील दिनांक 4 सप्टेंबरला सत्यपाल उडनुरवार व त्यांच्या कुटुंबाचे सत्यपाल यांनी शरीर सुखाची मागणी केली.

यावरून झालेल्या वादात सुनिता मेश्राम यांनी नकार दिल्याने त्याच्या कुटुंबातील नातेवाईक सह पाच ते सात व्यक्तींनी बेशुद्ध पडेपर्यंत दगडाने ठेचून मारपीट केली होती यावरून महिलेने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने भातुर मातुर चौकशी करून भा द वि च्या कलम 324 504 506 34 अन्वय गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा घटनेच्या विपरीत दाखल झाल्याने माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी सुनीता मेश्राम यांचेवर झालेल्या अन्याय गंभीर असताना पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका निर्माण करीत पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता झालेल्या घटनेच्या या आधारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली.

याबाबत विरूळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राहुल चव्हाण यांनी चौकशी चे चक्र व परिस्थितीचे अवलोकन करून झालेल्या घटनेवरून सत्यपाल व त्यांच्या साथीदारांवर कलम 141 143 147 149 354 अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 कलम 1 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यासाठी चौकशी सुरू आहे उपरोक्त आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल अशी माहिती दिली.

यामुळे सुनिता मेश्राम त्यांच्यावर झालेला अन्यायाला दोषीवर कारवाई झाल्याने मेश्राम कुटुंबाला धीर मिळाला आहे आदिवासी कुटुंब वार असा अन्याय होऊ नये व झालेल्या घटनेनुसार दोषीवर कारवाई झाल्याने समाजातील लोकांनी अखेर सुनीताला न्याय मिळाला अशा भावना व्यक्त करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat