खांबाडा केंद्रातील मुख्यध्यापकांची मोठेगाव येथे सभा संपन्न

Spread the love

खांबाडा केंद्रातील मुख्यध्यापकांची मोठेगाव येथे सभा संपन्न

 

 

 

म मराठी न्यूज मिडिया सुनिल कोसे 

 

 

चंद्रपूर:-     चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या मोठेगाव येथे चिमूर पंचायत समिती अंतर्गत खांबाडा केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांची अनेक विषयांवर चर्चा आणि विविध योजनांची माहिती यावर 15 सप्टेंबर ला जी प शाळा मोठेगाव येथे सभा संपन्न झाली

खांबाडा केंद्रातील सर्वच जिल्हा परिषद व उंच माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा मोठेगाव येथे आयोजित करण्यात आली होती या सभेला मार्गदर्शक म्हणून जे एच राऊत शी वि अ बिट नेरी एम टी कामडी केंद्रप्रमुख खांबाडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

या सभेत चर्चा करताना सन 2001 ते 20021 पर्यंत या कालावधीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत जमा खर्चचा उपाययोजना प्रमाणपत्र सादर करणे यावर चर्चा करण्यात आली तसेच महाराष्ट्र बँकेत मुलांचे खाते काढणे आणि यावर येणाऱ्या समस्या याबाबत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम कसे राबविता येईल यावर चर्चा करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली तसेच या योजनांचा लाभ कसा होईल या साठी काय करावे लागेल याची सविस्तर चर्चा करण्यात आली..

यात मार्गदर्शकानी अनेक विषयांवर मार्गदर्शन मुख्याध्यापक वर्गाला केले शाळेचे व विद्यार्थ्यांचे हित जोपासून शाळेची प्रगती कशी साधता येईल दिशानिर्देश दिले या सभेला या केंद्रातील सर्वच मुख्याध्यापक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat