महिलांवरील वाढते अत्याचार थांबवा..! मायाताई ननावरे

Spread the love

महिलांवरील वाढते अत्याचार थांबवा..! मायाताई ननावरे भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्ष

 

 

तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

 

 

 

M marathi news media सुनिल कोसे 

 

 

राज्यात आणि देशात महिला हया सुरक्षित राहिल्या नाहीत दिवसेंदिवस महिलांवरती अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे या अत्याचाराला अनेक महिला बळी पडत असून गुंड प्रवृत्तीची विकृत मानसिकता समाजात वाढत चाललेली आहे महिलांवर अत्याचार करून त्यांचा खून केल्या जात आहे राज्यात अश्या घटना वाढल्यामुळे महिला सुरक्षित नाहीत तेव्हा राज्य सरकारने या गुन्हेगारी, विकृत मानसिकतेला संपवण्यासाठी कठोर कायदे करून गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देऊन शासनाने कडक पाऊले उचलीत महिलावरील अत्याचार थांबवावे अशी मागणी सौ मायाताई ननावरे यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दि 16 सप्टेंबर ला निवेदन देऊन केली आहे

महिलांवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे त्यांत मुंबई उपनगरातील – साकीनाका येथे अत्यंत क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली. तसेच वरोरा येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार तसेच चंद्रपूर येथे एकतर्फी प्रेमातून झालेली हत्या असो, सगळया घटनांकडे सजगपणे पाहिल्यावर महिला राज्यात सुरक्षित नसल्याचेच समजते. या सर्व घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा तर व्हावीच, शिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी एखादा अॅट्रासिटी अॅक्टसारखा कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडी चिमूर च्या वतीने करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या तालुका अध्यक्षा मायाताई ननावरे यांच्या नेतूत्वात मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले यावेळी न प च्या माजी गटनेत्या छायाताई कांचार्लवार भारती गोडे कल्याणी सातपुते नाजमा शेख आशा मेश्राम उपस्थित होत्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat