एव्हरेस्टवीरांनी नोकरी करिता केली शासनाकडे मागणी.   

Spread the love

जिल्हाधिकारी यांना निवेदन आ.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

 

चंद्रपूर/ कोरपना: मिशन शोर्य-२०१८अंतर्गत कोरपना व जिवती या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातील ५ पंचारत्नांना शासनाने दिलेल्या अश्वासणानुसार गृह विभागात नोकऱ्या देण्यात याव्या अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दि.१७.७.२०२१रोजी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना एव्हरेस्ट वीरांच्या समवेत प्रत्यक्ष भेटून मागणी केली. या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा सरचिटनिस नामदेव डाहुले, सुभाष कासमगोटूवार ,दत्तप्रसंन्न महादाणी व एव्हरेस्टवीर कु. मनीषा धुर्वे झुलबर्डी ता. कोरपना, उमाकांत मडावी गोविंदपूर ता. कोरपना, प्रमेश आडे चिंचोली ता.कोरपना, कविदास काटमोडे सगणापूर ता. जिवती, विकास सोयाम असापूर ता. जिवती यांच्यासह भेटून नोकरीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी निवेदन देण्यात आले. राज्याचे तत्कालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तथा अथक प्रयत्नातून व तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे प्रकल्प अधिकारी डी. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून आदिवासी विकास विभाग व जिल्हाप्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “मिशन शोर्य-२०१८या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील दहा पैकी पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एवरेस्ट शिखर सर करून अख्या देशाला आश्चर्याचा धक्का देऊन यशाचा झेंडा रोवून भारत देशासह महाराष्ट्राची, चंद्रपूर जिल्ह्याची आणि आदिवासी विकास विभागाची मान अभिमानाने उंचावली होती. या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या विक्रमी कामगिरीबध्दल देशाचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तत्कालीन राज्यपाल मा. विद्यासागरराव, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्तकालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन आ. वि. मंत्री विष्णू सावरा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते.

या पंचारत्न शौर्यवीरांना आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रु. सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते व शिक्षण पात्रतेनुसार गृहविभागात विशेष बाब या सदराखाली नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

या शोर्यवीरांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे त्यांना सन्मानाने जगण्यासाठी दिलेल्या अश्वासना नुसार गृह विभागाच्या वतीने येत्या काही दिवसात होणार असलेल्या मेगा पोलीस भरतीत सामावून घेण्याची विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे माजी आमदार निमकर यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat