बिबट्या च्या हल्ल्यात महिला जखमीी.!.

Spread the love

सामदा व्याहाड परिसरातील तिसरी घटना

सावली तालुक्यातील वाघोली येथील घटना

 

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यास वन विभाग अपयशी

 

चंद्रपूर/ सावली :- तालुक्यातील वाघोली. येथे मंगळवार पहाटे ५ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून महिलेस जखमी केल्याची घटना घडली असून तुळजाबाई मशाखेत्री (वय ६५) असे जखमी महिलेचे नाव आहे. दिवसेंदिवस तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून मानवास धोका निर्माण झालेला आहे. मात्र वन विभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यास अपयशी ठरत असल्याची परिसरात चर्चा आहे.

वनपरिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व्याहाड येथील नियत क्षेत्र सामदा अंतर्गत येत असलेल्या व्याहाड वाघोली येथे पहाटेच्या सुमारास महिला ही आपल्या राहते घरी झोपी गेली असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहाटे ५ वाजताच्या सुमारास महिलेच्या अंगांवर झेप घेत महीलेला जखमी केले.

सदरची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी महिले ला गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर च्या घटनेमुळे परिसरात सलग दोन आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने वन्यप्राण्यांमुळे दहशत पसरली असून नागरिक भयभीत झालेले आहेत.

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. परंतु वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी शेतावर जाण्यास भयभीत होत असून शेतीचा हंगाम करायचा की नाही या चिंतेत परिसरातील शेतकरीवर्ग आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात सावलीचे वन विभाग असमर्थ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसापूर्वी राखीव वनक्षेत्रात सामदा येथे वनांची तोड करून वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. मात्र संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना पाठीशी घेऊन कोणतीही कारवाई केली नसल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या कार्यकाळात जंगलाची तोड थांबविण्यास अपयशी ठरले असून तालुक्यातील जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने वन्य प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी व मानव असा संघर्ष वाढला आहे, तर वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्यालयी हजर राहत नाहीत अशी परिसरात चर्चा आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब गंभीर असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

सावली वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे परंतु संबंधित अधिकारी यांनी आपल्या कार्यकाळात जंगलतोड थांबविण्यास अपयशी ठरल्या मुळे वन्यप्राणी गावात शिरकाव करून मानवावर हल्ले करीत आहेत. ही बाब गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

अनिल स्वामी तालुका अध्यक्ष रा.का.सावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat