कृषी निविष्टा वाटप, भात पिक परिसंवाद व शेतकरी उत्पादक कम्पनी कार्यालयाचे उदघाटन

Spread the love

कृषी निविष्टा वाटप, भात पिक परिसंवाद व शेतकरी उत्पादक कम्पनी कार्यालयाचे उदघाटन

 

चंद्रपूर/सावली-  खरीप हंगामातील सन २०२१-२२ या कृषि वर्षात जिल्हा खनीज विकास प्रतीष्ठान चंद्रपुर अंतर्गत भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मीक अन्नद्रव्य व किड रोग व्यवस्थापन करिता शेतकऱ्यांना “कृषी निविष्ठाचे वाटप” व भात पिक परिसंवाद कार्यक्रम” सावली तालुका कृषी विभाग व गेवरा शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादीतच्या संयुक्त विद्यमाने गेवरा बुज येथे पार पडले. यावेळी गेवरा शेतकरी उत्पादक कम्पनी कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

सावली तालुका हा भात उत्पादन पिकांसाठी ओळखला जातो. भाताचे उत्पादन वाढावे याकरीता महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना कीड रोग व्यवस्थापन करीता खनिज विकास निधी अंतर्गत प्रायोगिक तत्वावर कृषी खते व औषधी साहित्य पुरविण्यात येत आहे. या साहित्याचे वाटप तालुका कृषी विभाग व गेवरा शेतकरी उत्पादक कम्पनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले व भात पीक उत्पादन वाढीसाठी परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमादरम्यान भात पिक उत्पादकता वाढीसाठी करावयाच्या उपाय योजना,खते व पाणी व्यवस्थापण, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन,शेंद्रीय पिकं प्रमाणीकरण,माती परिक्षण, शेती करीता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर. सेंद्रीय भाजीपाला,शेती पुरक व्यवसाय,समुह शेती,शेतमालाचे मुल्यवर्धीत रुपांतरण प्रक्रीया उद्योग, शेतमाल आयात-निर्यात,शेत माल साठवणुक गोदाम योजना, त्यासोबतच डाॅ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रा मार्फत निर्मीत विविध शंशोधित धानांच्या सुधारीत जातीचा वापर, स्व गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा योजना, इत्यादींवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले

या कार्यक्रमाकरीता प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे कार्यक्रम समन्वयक डाॅ. व्ही,जी, नागदेवते, कृषी मंडळ अधिकारी ए.व्ही,वाघमारे,

पंचायत समिती सभापती तथा संचालक विजय कोरेवार, ग्रामीण पत्रकार संघ सावली तालुकाध्यक्ष अनिलभाऊ स्वामी, चंद्रपुर- गडचिरोली शेतकरी उत्पादक कंपनी, सावलीचे संचालक चेतन रामटेके, गेवरा शेतकरी उत्पादक कंपनीचे जेष्ट संचालक राजेश शिध्दम, संचालक किरण पा. चन्नावार, गेवरा बुज च्या सरपंच सुषमाताई मुन्घाटे, गेवराखुर्द सरपंचा उषाताई आभारे, चिखली सरपंच रेखाताई बाणबले, उपसरपंच तिलेश वाढणकर, गेवरा शेतकरी उत्पादक कंपनी संचालक वंदनाताई फुलबांधे, तालुका कृषी पर्यवेक्षक नंदनवार, संचालक काशीनाथ गुरुनुले, यांची उपस्थीती होती..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालकीय समन्वयक विजय कोरेवार , सुत्र संचालन कंपणीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप फुलबांधे यांनी केले, आभार कंपणीचे जेष्ट संचालक किरण पा. चन्नावार यांनी मानले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat