देवधरी घाटात खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल स्वाराचा भीषण अपघात.

Spread the love

देवधरी घाटात खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल स्वाराचा भीषण अपघात.

 

 

अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी 

 

 

म मराठी न्यूज मिडिया/ संजय कारवटकर

 

 

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वर देवधरी घाटात

मोटरसायकल स्वाराचा रोडवरील खड्डा चुलविण्याच्या नादात अपघात होऊन यात मोटरसायकल स्वार हा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दि 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मी घडली,

दहेगाव येथील दत्तूजी खोके वय 55 वर्ष हे आपल्या मोटरसायकल क्र एम एच 29 व्हाय 9429 ने करंजी येथून आपल्या गावी दहेगाव येथे जात असता देवधरी घाटाजवळ रोडवरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनावरून नियंत्रण सुटून मोटरसायकल ही खड्यात आदळली यात दत्तूजी खोके यांच्या अपघात होऊन डोक्याला व हाता पायाला जबर मार लागला तसेच डोक्यातून व कानातून रक्ताचा स्त्राव सुरू होता.

अपघाताची माहिती वडकी पोलिसांना व नातेवाईकांना कळताच त्यांनी तात्काळ जखमीला पुढील उपचारासाठी करंजी येथे दाखल केले.या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat