क्रिडा संकुल मधील निकृष्ट दर्जाच्या कामाने रनिंग ट्रॅकवर साचले पाणी

Spread the love

क्रिडा संकुल मधील निकृष्ट दर्जाच्या कामाने रनिंग ट्रॅकवर साचले पाणी

 

यवतमाळ :-  राळेगाव येथील क्रिडा संकुलमध्ये मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून रनिंग ट्रॅक व फुटबॉल मैदानाचे सपाटीकरण व मजबुतीकरणाचे काम केले . आता पहिल्याच पावसाळ्यात व महिन्यांत आलेल्या पावसाने मैदानाला तळयाचे स्वरूप आले आहे . त्यामुळे खेळाडूंच्या सरावावर विपरीत परिणाम होत आहे . प्रशासकीय भवनाच्या परिसरातील पाणी सुरक्षा भिंतीतील खालील बाजूला असलेल्या अनेक छिद्रातून क्रीडा संकुलात येते . वरील कामे करताना येणाऱ्या या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्याची गरज होती. परंतु या मध्ये क्रीडा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार तीघांनी याकडे दुर्लक्ष केले . आता येथे पाणी साचते व चिखल होत आहे . रात्रीच्या वेळेस याचा अंदाज येऊ शकत नसल्याने खेळाडूपाय घसरुन पडतात , अशा तक्रारी वाढल्या आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांनी याकडे लक्ष घालून ट्रॅक व मैदानात पाणी साचणार नाही , अशी दुरुस्ती करून देण्याची खेळाडूं व क्रीडाप्रेमींची मागणी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat