७ वा आंतरराष्ट्रीय योग दिन !

Spread the love

         ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिन !

 

 

 

 

वराेरा ,चंद्रपूर विदर्भ -किरण घाटे विशेष प्रतिनिधी – दरवर्षी प्रमाणे या वर्षी जगभरात (सोमवार दि.२१जूनला) आज याेगदिन साजरा हाेताेयं आहे .पहाटे पासूनच काही भागात या कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे .काेराेनाचे सावट असतांना सुध्दा याेगसाधकांमध्ये उत्साह संचारला असल्याचे चित्र कालपासून द्रूष्टीक्षेपात पडु लागले आहे .याच दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठा वरील काव्यकुंजच्या जेष्ठ सदस्या वंदना अजय आगलावे यांनी एक लेख शब्दांकित केला आहे .ताे येथे देत आहाे .

शरीर माध्यम , खलु धर्म साधनम !

शरीर सुदृढ निरोगी असेल,तर माणसाचे मन सुद्धा सुदृढ आणि निरोगी असते. सुदृढ शरीर हे विविध गोष्टी साध्य करू शकते. स्वतःचा आणि समाजाचा विकास साधण्याचे धैर्य निरोगी व्यक्ती मध्ये असते.

“Sound body in a sound

mind ”

असे म्हणतात सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. हे अगदी बरोबर वाटते.

निरोगी शरीरात एक वेगळाच उत्साह संचारतो. शरीर जर विविध व्याधींनी ग्रासले असेल तर अनेक गोष्टी करण्याची इच्छा असून सुद्धा ते शक्य होत नाही. मला हे करायचं होतं ,मला ते करायचं होतं, पण शरीर साथ देत नाही. अशा अनेकांच्या तक्रारी आपण नित्य नेमाने ऐकतो. खरंच आहे ते! शरीर हीच खरी संपत्ती आहे!

Health is wealth.

म्हणूनच शरीर निरोगी असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शरीर निरोगी ठेवण्याचा रामबाण उपाय म्हणजे योग! योग हा असा स्त्रोत आहे, विनामूल्य , आणि इतरां च्या मदतीशिवाय ,कुठेही न जाता ,

घरच्या घरी बसून विना खर्चाने शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे साधन म्हणजे योग.

योगा ला जीवनाचा अविभाज्य घटक बनवा. सकाळी उठून अर्धा तास चालणे, आणि अर्धा तास योग केल्याने शरीराला बऱ्याचशा आजारापासून आपण खूप दूर ठेवू शकतो. योग केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. योगामुळे शारीरिक मानसिक व भावनिक संतुलन सुद्धा चांगले राहते. आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी फक्त सकाळी उठून एक तास स्वताला देणे गरजेचे आहे.

आज योग दिन आहे म्हणून फक्त आजच्या पुरता योगा करून फोटो काढणे नव्हे तर दररोज योगा करा आणि निरोगी रहा.

योगाचे महत्त्व लक्षात घेऊन, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५साला पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे घोषित केले आणि जगाला आवाहन केले, की देशातील सर्व लहान मुलांपासून तर मोठ्या माणसा पर्यंत सर्वांनी योग करा. तेव्हापासून आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो. ठीक,ठिकाणी जाऊन फोटो काढतो. परंतु दुसर्‍या दिवशी मात्र विसरून जातो. असे करू नये सर्वांनी स्वतःला सकाळी उठायची सवय लावून घ्यावी. आणि योगाला सुरुवात करावी.

 

योगा करावा आवडीने,

आरोग्य लाभेल सवडीने.

 

योग जवळ, तर रोग दूर.

 

तंदुरुस्त नागरिकच देशाला सुख समृद्धी, आणि प्रगतीकडे नेऊ शकतो.

 

सौ वंदना अजय आगलावे (कु. वंदना गोविंदराव बोढे) सहजं सुचलं काव्यकुंज सदस्या वराेरा जि.चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat